❇️मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सोप्या भाषेत समजून घ्या.....❇️

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
 सोप्या भाषेत समजून घ्या.....









❇️ सोप्या भाषेत समजून घ्या 

◾️वय 21 ते 60 वर्षे

◾️दरमहा 1500 रुपये मिळणार

◾️दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार

◾️अंमलबजावणी : 1 जुलै 2024 पासून                                          

➡️ शेवट तारीख 15 जुलै 2024



❇️ पात्रता पहा 


◾️महाराष्ट्र रहिवासी 

◾️विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला

◾️लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे

◾️60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल

❇️ आपत्र कोण असेल 

◾️2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे

◾️घरात कोणी Tax भरत असेल तर

◾️कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर

◾️कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर

◾️कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )


❇️ लागणारी कागदपत्रे 

आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्न दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , फोटो

➡️ लागणारी आवश्यक कागदपत्रे आजच काढून घ्या नंतर होणारी धावपळ वाचवा.           

▶️ जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ घ्यावा.

Post a Comment

0 Comments