वर्ल्ड कप विजयानंतर विराट मागोमाग रोहितने देखील घेतली टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती
टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये निर्णायक खेळी करून सामनावीराचा किताब पटकावणाऱ्या विराटने सामन्यानंतर हा माझा शेवटचा टी-२० वर्ल्ड कप होता असं म्हणत निवृत्तीची घोषणा केली होती. विराटच्या या निर्णयानंतर कर्णधार रोहित शर्मानेदेखील टी-२० मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विराट आणि रोहित यांच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
भारतानं फायनलमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत निर्धारित २० ओव्हर्समध्ये ७ आऊट १७६ रन केले. टीम इंडियाकडून विराटनं सर्वाधिक ७६ रन केले. संपूर्ण स्पर्धेत फेल गेलेल्या विराटनं त्याचा सर्वोत्तम खेळ फायनलसाठी राखून ठेवला होता. पहिल्या तीन विकेट्स झटपट गेल्यानंतर विराटनं अक्षर पटेलच्या मदतीनं भारताची इनिंग सावरली. अक्षरनं ४७ रन करत भारताच्या इनिंगमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं. भारतानं दिलेलं १७७ रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेला पेलवलं नाही. त्यांना ८ आऊट १६९ रनपर्यंतच मजल मारता आली. भारतानं ११ वर्षांनी एखाद्या आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. तर १७ वर्षांनी टी २० विजेतेपदाला गवसणी घातली.
माझी भारतासाठी शेवटची T२० मॅच होती. आम्हाला विजेतेपदाची ट्रॉफी उंचवायची होती. हे एक ओपन सिक्रेट होतं. मी पराभूत झाल्यानंतर हा निर्णय जाहीर केला नसता असं नाही. पुढच्या पिढीनं T२० क्रिकेटला चालना देण्याची वेळ आली आहे. आमच्यासाठी ही खूप मोठी प्रतीक्षा होती. तुम्ही रोहित शर्माकडं पाहा. तो ९ टी२० वर्ल्ड कप खेळला आहे. हा माझा सहावा टी२०वर्ल्ड कप होता. या विजेतेपदावर त्याचा (रोहित शर्मा) हक्क आहे. सध्या भावनांवर नियंत्रण ठेवणं खूप अवघड आहे. मला वाटतंय की हे सर्व समजायला आणखी वेळ लागेल.
0 Comments